Monday, August 6, 2012

कुहू

 ए कुहू, मला ना तू भारी आवडतेस. तुझं एका लग्नाची मधलं character एकदमच मस्त आहे. ते तुझं कविता करणं, इतकं निरागस असणं... असलं तर खूप खूष नाहीतर मग अगदीच रडत बसणं. मला मी शाळा-कॉलेज मध्ये असतानाची आठवण करून देतं. तसं मी अगदी आता-आतापर्यंत अशीच होते. मलाही कविता खूप आवडायच्या. ते असं काव्यात्मक तर मी एकटीच बोलत बसायचे; घरात कुणी नसताना. कितीतरी चारोळ्या तोंडीपाठ केल्या. नंतर या कामाच्या रगाड्यात हे सगळं कधी विसरले कळलंच नाही. पण अजूनही कुठल्याही गाण्यातली एखादी ओळ आवडली की मी ती लक्षात ठेवते.
आजची तुझी ती ओळ - "चंद्राची उशी करून अंधाराची दुलई पांघरून घेते." वाह वाह! काय उपमा आहे, राव! सहीच! सॉलिड वाटलं अगदी.

2 comments:

Prashant said...

I hate kuhu ani Dynana's character as these characters are just used to stretch that TV serial more. Yes but definitely the poems spoken by her are really good most of the times. :)

Pranali Brahmankar said...

I don't know about Dnyana, but Kuhu is definitely observable! I liked her because she exists somewhere in me. Not exactly, but yes, at some extent.

And about serial getting extended, then it's ok when it's showing/revealing some fact of reality. I liked it about Kuhu. You know what? I also liked when Vallabh - Kuhu's father expresses his grief of being ignored because he was not considered much at home because he is neither the youngest nor the eldest. That's the grief of middleness among noticeable extremities. ;)
I love reading/watching such facts. :D