Saturday, July 30, 2011

वाचन

वाचन पुन्हा एकदा सुरु झालं. जुनी कवितांची वही बाहेर आली. पूर्वी कविता कधी तोंडीपाठ व्हायच्या ते कळायचं सुद्धा नाही. कंटाळा आला की वही काढायची आणि मोठ्याने कविता वाचायच्या, असा छंदच होता.. चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळ्या तर जशा रक्तात मुरलेल्या. पाडगावकरांच्या कवितासुद्धा कितीतरी लक्षात होत्या. त्यावेळी साहित्याचे स्त्रोत फारच मर्यादित होते तरी सुद्धा वही भरलेली असायची. आणि आज अथांग महासागर डोळ्यासमोर असताना सुद्धा वही कोरीच आहे. खरं तर, वही अस्तित्वातच नाहीये. पुरे झालं दुर्लक्ष! आता मात्र लिहायचं.. कितीतरी विषय खूप सुंदर असतात, वाचलेही जातात थोडेफार. पण बुद्धी फार तीक्ष्ण नसल्याने काही मनाच्या कोपऱ्यात विसावतात, काही थांगपत्ता लागू न देता भुरकन उडून जातात. आता मात्र लिखाणास पुन्हा सुरुवात करायची.चला तर मग.. आरंभ करू..
- प्रेरणा मिळाली कालच्या पुण्यातल्या FM वरच्या व्यक्ती आणि अभिव्यक्ती कार्यक्रमातल्या कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांच्या बोलण्याने!

2 comments:

Prashant said...

I am checking your post after long time and wondered that u still write almost regularily. Just taking inspiration from you, I am resuming my blogging too. So keep reading my blog as well :)

Pranali Brahmankar said...

yeah.. I'm fond of reading blogs. Please give me more to read ;)